भरधाव बसची उभ्या ट्रॉलीला धडक ; १० जण जखमी

0

संगमनेर : पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात भरधाव बसने उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने धुळे जिल्ह्यातील १० जण जखमी झाले आहे. दरम्यान, या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी पहाटे २ वाजता ट्रॅव्हल्स बस (एम. एच. १८ बीए ७८३०) पुणे येथून धुळे जिल्ह्यातील शहादा येथे प्रवाशी घेऊन निघाली होती. ही बस संगमनेरच्या पोखरी बाळेश्वरच्या हद्दीत आली असता महामार्गावरील उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये बसमधील चाकासह दहा प्रवाशी जखमी झाले. बसची पुढच्या बाजूची काच फुटली असून इतर ठिकाणी बसचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.