जिद्द, चिकाटी व चौफेर वाचन आवश्यक – भूषण गादिया

0

भडगाव (प्रतिनिधी) : वाणिज्य शाखेच्या विध्यार्थ्यांना नोकरीच्या व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी अतोनात परिश्रम, जिद्द, चिकाटी व चौफेर वाचन आवश्यक आहे, असे विचार जळगाव येथील सी.ए.भूषण गादिया यांनी भडगाव महाविद्याल यात आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ . एन .एन .गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश परदेशी, वक्ते रवींद्र पाटील, उप प्राचार्य एस.आर.पाटील हे उपस्थित होते .

गादिया यांनी अर्थसंकल्प 2020 या विषयावर बोलताना यंदाच्या अर्थ संकल्पात अर्थमंत्र्यांनी केलेल्या विविध सुधारणा ,स्टार्ट अप साठी केलेली तरतुद, भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून केलेले बदल, आधार व पॅन कार्ड याबाबत सरकारी धोरण इत्यादी बाबत सविस्तर विवेचन केले. अर्थ संकल्प म्हणजे काय, करपात्र उत्पन्न व करसवलत, अर्थ संकल्पतील विविध महत्त्वाच्या बाबत सविस्तर वर्णन केले.

नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करतांना घ्यायची काळजी, त्यासाठी आवश्यक बाबी या बाबत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर व्याख्यान माजी विद्यार्थी संघ, कॉमर्स व अर्थशास्त्र विभागा तर्फे आयोजित केले होते. प्रा.डॉ.सचिन हाडोळंदीकर, प्रा.डॉ.बी.एस.भालेराव, प्रा.सरोज अग्रवाल, प्रा.कोळी, प्रा.देवरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी तर आभार प्रा .डॉ .दीपक मराठे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.