पुण्यात गॅस गिझरमधील वायूमुळे तरुणाचा गुदमरुन मृत्यू

0

पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील एका सोसायटीमध्ये गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे 30 वर्षीय तरुणाचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा आणि बाथरुमचा दरवाजा तोडून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.  याबाबत कोथरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमधील वायूमुळे गुदमरुन मृत्यू होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईतीही एका तरुणीचा गिझरमधील गॅसमुळे बाथरुममध्येच गुदमरुन मृत्यू झाला होता.  आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी सर्रास गॅस गिझर वापरले जातात मात्र, त्याच्या सुरक्षाविषयक नियमांकडे बहुधा दुर्लक्ष केलं जातं. याच नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.