भरधाव ट्रॅक्टरची कारला धडक; दोन जण ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्कजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने करमधील दोघे ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

एमएच १४ एफसी ४५५० या क्रमांकाच्या कारला लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामुळे कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

सदर अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.