भडगाव शहरातून जाणाऱ्या जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गाची त्वरित उंची कमी करावी, नागरिकांचे निवेदन

0

भडगाव | प्रतिनिधी
शहरातील जळगाव चांदवड महामार्गाचे काम सुरू असून शहरातील पाचोरा रस्त्यावरील मनसुख पेट्रोल पंप ते शिवनेरी दरवाजा पर्यंत रस्ता हा पाच ते सहा फूट उंच केल्याने स्थानिक नागरिकांचा अडचणीचा विषय ठरला  असून. रस्त्याची उंची तात्काळ कमी करावी अशी मागणी होत आहे या बाबत नागरिकांनी रास्टीय महामार्ग विभागीय कार्यालय धुळे तसेच आमदार किशोर आप्पा पाटील , खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन रस्त्याची उंची कमी करावी भविष्यात होणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करावे अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाचोरा रस्त्यावरील जळगाव चांदवड महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या कॉलनी भाग हा अगोदरच खोलगट भाग असल्याने येथे पावसाळ्यात तलावाचे स्वरूप येते. तसेच रस्त्याचे काम सुरू असून यात कॉन्ट्रॅक्टर ने त्याची उंची ही भर करून पाच ते सहा फूट उंच घेतली आहे या मुळे पाणी निघण्यास जागा नाही . यात विशेष बाब म्हणजे शहरातील प्रास्तविक दुभाजकांच्या एक बाजूचा रस्ता सुमारे आठ मीटर रुंद तयार होणार असून सदर महामार्गावर दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहणं, अवजड वाहने, गावातील नागरिक पादचारी, जनावरे व इतर प्राणी अशी सतत वर्दळ असणारे आहे. त्यामुळे आरटीओ नियमाप्रमाणे सदर प्रास्तविक महामार्गावरील भडगाव नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरून ताशी ८० कीमी स्पीडने कोणताही रस्ता असू शकत नाही . ही बाब लक्षात घेऊन महामार्ग धोकेदायक व चुकीचा बनविण्यात येत आहे. या निवेदनाची वेळीच दाखल न घेतल्यास चुकीच्या व भविष्यात अपघातास संपूर्ण जबाबदारी आपली असेल असे निवेदन दिले आहे. या निवेदनावर सुनील मुकुंदराव महाजन, संजय पंडित पाटील, जोहर अली सैफुद्दिन बोहरी, डॉ. अशोक ऑस्तावल, विक्रम शेखावत, ईश्वर पाटील, राजीव पाटील, विजयसिंह शेखावत, कल्पेश महाजन, शंकर हिवानी, कय्युब मिर्झा, उदय देशमुख, डॉ. मधुकरराव सोनवणे, मदनलाल जैन , सुभाष जैन, आदींच्या सह्या आहेत.

या महामार्गा बाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संभादित धुळे येथील कार्यकारी अभियंता महामार्ग यांना रस्त्याची उंची १ मिटरणे कमी करावी असे पत्र दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.