भडगाव येथे ३१ रोजी भीमगीतांचा कार्यक्रम

0

भडगाव;- येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीनिमित्त महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्दीशीय संस्थेच्या वतीने उद्या ( ता. 31) रोजी रात्री आठला शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणात भिमगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रम ला आमदार कीशोर पाटील, राजुमामा भोळे, नगरध्यक्ष राजेंद्र पाटील, पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहील, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ संजीव पाटील, युवानेते अमोल शिंदे , डी.एम.पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, नगरसेवक अमोल पाटील, कजगाव चे दिनेश पाटील, भगवान खरे, गणेश जावरे, डाॅ. भुषण मगर, माजी जि.प.सदस्य श्रावण लिंडायत, अविनाश अहीरे, डाॅ. प्रमोद पाटील, सुरेंद्र मोरे,श्रृषिकेश पाटील, उद्योजक समीर जैन, डाॅ. पंकज जाधव, काॅट्रांक्टर दौलत जोधंळे, संजय मोरे, डाॅ. कीशोर पाटील, आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. गायक राजु बागुल ( मुबंई) व गायिका सुहासनी शिंदे ( मुबंई) यांच्यात भिमगितांचा सामना रंगणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक एस.डी.खेडकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.