एसडी –सीड प्राइड मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे

0

 

सर्व लाभार्थ्यामध्ये मेळाव्याची उत्सुकता

जळगाव: एसडी-सीड मार्फत रविवार दि. ३ जून रोजी सकाळी ९ ते दु. १ यावेळेत हॉटेल फोर सीज़न्स रीक्रीएशन (हॉटेल मैत्रेय), जळगाव येथे प्रथमच निवडक एसडी-सीड प्राईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी लाभार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

सर्व एसडी-सीड प्राईडमध्ये कमालीची उत्सुकता

सर्व एसडी-सीड प्राईडमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. प्रथमच सर्व एसडी-सीड माजी लाभार्थी कार्यक्रमासाठी एका छताखाली एकत्र येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून १५५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. त्यातील ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत एसडी-सीड शिष्यवृत्तीच्या मदतीच्या सहाय्याने त्यांनी यशस्वी करिअरची सुरुवात करून नोकरी, व्यवसायामध्ये यशस्वी झाले आहेत व आपल्या पायावर उभे आहेत. आपल्या आयुष्यात बिकट परिस्थितीशी संघर्ष करून, कठोर मेहनत घेऊन एसडी-सीड यश प्राप्त केले अशा एसडी-सीड प्राईडचा नेहमीच अभिमान राहिला आहे. या माध्यमातून एसडी-सीडच्या या विद्यार्थी हिताच्या कार्यात स्वताचा हातभार लावण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे.

——रोजगाराच्या संधी मिळवून देण्याबाबत प्रयत्न —
यात २००८ सालापासूनच्या सर्व एसडी-सीड प्राईडला एकत्र आणणे, त्यांची सद्यस्थिती जाणून घेणे, जे सध्या नोकरी करीत आहेत किंवा व्यवसाय करीत आहेत आणि जे अद्याप व्यावसायिक करिअरमध्ये स्थिर नाहीत यांच्या मध्ये चर्चासत्राचे आयोजन करणे, तसेच नोकरीसाठी अपेक्षितांना नोकरीसाठी रोजगाराच्या संधी मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणे हे या मागचे मुख्य उद्धिष्ट आहेत.

नामवंत व्यक्तीमार्फत मार्गदर्शन

व्यावसाईक करिअरचा विचार करून आणि सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशी कार्यक्रमाची मांडणी केली आहे. जिल्यातील नामवंत उद्योजक मा. श्री. अतुल भाऊ जैन सह-व्यवस्थापकीय संचालक जैन इरिगेशन जळगाव, मा. श्री. संजय प्रभूदेसाई वरिष्ठ महाव्यवस्थापक सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव तसेच मा. श्री. धीरज चव्हाण Tech. leader इंटेल इंडिया प्रा. लि. बंगलोर हे मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून सर्व एसडी-सीड प्राईड यांना मार्गदर्शन करतील तसेच करिअर विषयक शंका समाधान करतील

तरी निमंत्रित एसडी-सीड प्राईड ने उपस्थित राहण्याचे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.