भडगाव येथील बूथ क्र.१०७ वरील मतदान केंद्रावर 48.44 टक्के मतदान

0

भडगाव | प्रतिनिधी
03-जळगाव लोकसभा मतदार संघा अंतर्गत 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 107 भडगाव येथे आज 48.44 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
या मतदान केंद्रांतर्गत पुरुष मतदार 690, स्त्री मतदार 652 असे एकूण 1342 मतदार होते. यापैकी 354 पुरुष मतदार, 296 स्त्री मतदार असे एकूण 650 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी 48.44 टक्के आहे.
आज सकाळी 6 वाजता मॉकपोलपल घेण्यात आला. त्यानंतर सकाळी 7 वाजता मतदानास सुरवात झाली. मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदानास सुरवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान झाले. यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 21.24 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 28.46 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 34.58 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 43.82 आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 48.44 टक्के मतदान झाले असल्याची माहिती 18- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. या निवडणुकी दरम्यान पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार गणेश मरकड, मुख्याधिकारी विकास नावळे, पोलिस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, दोन पोलिस उप निरीक्षक, तळ ठोकून होते. तसेच भडगाव, पाचोरा, चाळीसगाव येथून 20 पोलिस कर्मचारी, व महसूल चे कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.