भडगाव नगरपरिषदच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून समिक्षा पाटील प्रबळ दावेदार !

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका जकिरा बी मलिक यांचे निधन झाल्याने या प्रभागाची पोटनिवडणूक लागली असून या प्रभागामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी निश्चित असे म्हणत घरोघरी भेटी सुरु केल्या आहे. या मध्ये शिवसेनेतर्फे समिक्षा लखीचंद पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भडगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक ३ मध्ये पोटनिवडणूक लागली आहे.  या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दि.४ ते १२ पर्यंत नामनिर्देशन दाखल, दि.१३ रोजी छाननी,१८ रोजी माघार, व २९ रोजी मतदान,३० रोजी निकाल असा कार्यक्रम लागला असून या प्रभागामध्ये वडधे येथील समिक्षा लखीचंद पाटील ह्या शिवसेनेकडून १२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. प्रभागात सौ. समिक्षा पाटील व त्यांचे पती लखीचंद पाटील यांचे सामाजिक कार्य यासह विविध उपक्रम राबवित असतात. प्रभाग क्रमांक ३ या जागेसाठी त्यांनी दावा केला असून आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहे असे यावेळी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.