एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून ऑफर !

0

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी अनेकवेळा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलेले खडसे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. खडसेंच्या या भेटीगाठीच्या दौऱ्यावरुन काँग्रेसने खडसेंना ऑफर दिली आहे.

”नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अवहेलना झालेली आम्हालादेखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल, पक्षाला बळकटी मिळेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी,” असा टोलाही थोरातांनी लगावला.

राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.