भडगाव तालुक्यात बसफेऱ्या पुर्ववत सुरु करण्याची मागणी

0

प्रवाशांचे प्रवासासाठी आतोनात हाल

भडगाव – तालुक्यात ग्रामिण भागात लाॅकडाउन काळात म्हणजे तब्बल ९ महिने जवळपास बस फेऱ्या बंदच आहेत. प्रवाशांचे प्रवासासाठी आतोनात हाल होत आहेत. याकडे पाचोरा आगाराचे दुर्लक्ष होत आहे. तरी पाचोरा आगाराने भडगाव तालुक्यात बंद असलेल्या ग्रामीण भागातील बस फेर्या पुर्ववत सुरु कराव्यात. प्रवाशांची गैरसोय टाळावी. अशी मागणी भडगाव तालुक्यातील नागरीक, विदयार्थी , प्रवाशी वर्गातुन जोर धरीत आहे.

याबाबत माहिती अशी कि, भडगाव बसस्थानकात पाचोरा आगारातुन बसफेऱ्या सोडल्या जातात. भडगाव बसस्थानकातुन भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. माञ कोरोनाची स्थिती भडगाव तालुक्यात वाढल्याने लाॅकडाउन काळात तालुक्याच्या बसफेऱ्या पाचोरा आगाराने बंद केलेल्या होत्या. सर्वञ परीस्थिती पाहुन हा एस. टी. महामंडळाचा निर्णय होता. आता माञ कोरोनाबाबतची परीस्थिती आटोक्यात येतांना दिसत आहे. तसेच आता शाळाही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह विदयार्थीही भडगाव तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करतील. यापुर्वी पाचोरा आगाराने भडगाव बसस्थानकामार्फत लांब पल्याच्या बसेस सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रवासाची मोठी सोय झाली आहे. दिपवाळी सणालाही बसफेऱ्या प्रवाशांनी गर्दीने जातांना दिसुन आल्या. भडगावचे तब्बल ९ महिन्यापासुन ओस पडलेले बसस्थानक दिपवाळीला प्रवाशांच्या गर्दीने गजबललेले नजरेस पडले. प्रवाशी संख्या वाढत आहे. लांब पल्याच्या बसमध्ये प्रवाशी प्रवास करतांना दिसत आहेत. माञ भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात राहणार्या प्रवाशांचे काय? असा प्रश्न नागरीकातुन उपस्थित केला जात आहे. भडगाव येथे नागरीकांना शासकीय वा खाजगी कामांना येण्यासाठी मोठा अङचणीचा सामना करीत वा जादा आर्थीक भुर्दंड सहन करीत यावे लागते. त्यामुळे प्रवाशी वर्गातुन नाराजी व्यक्त होत आहे. आता तरी पाचोरा आगाराने भडगाव तालुक्यात पुर्वी बंद केलेल्या ग्रामिण भागातील बस फेर्या पुर्ववत सुरु कराव्यात. प्रवाशांची सोय करावी. गैरसोय टाळावी.अशी मागणी भडगाव तालुक्यातील बस सेवेपासुन वंचित नागरीक, विदयार्थी वर्गातुन होतांना दिसत आहे. भडगाव तालुक्यात बसफेऱ्या सुरु झाल्यावर एस. टी. महामंडळाला आर्थीक उत्पन्नही मिळेल. तरी प्रवाशांची मागणीची तात्काळ दखल घ्यावी. याकडे तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनीही लक्ष दयावे. अशी अपेक्षा तालुक्यातील नागरीकांना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.