बोदवड येथे पत्रकार दिनानिमित्त नाभिक समाज महामंडळातर्फे पत्रकारांचा सत्कार

0

बोदवड – येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्पणकार आर्चाय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शहरातील शासकीय विश्रामगृहात नाभिक समाज महामंडळ यांच्या तर्फे तर तालुक्यातील जामठी ग्रामपंचायतीच्या वतीने जामठी येथे परिसरात विविध वृत्तपत्रांच्या पञकारांचा सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.याचं दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनही आहे.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस’पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून बोदवड येथील नाभिक समाज महामंडळातर्फे पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने येथील पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना नाभिक समाज तालुकाध्यक्ष विवेक वखरे, दुकानदार संघटना अध्यक्ष अनिल कळमकर, उपाध्यक्ष धनराज शेळके,तालुका सचिव गणेश सोनोने,जिवा संघटनेचे योगेश वखरे, सोपान महाले तर जामठी येथे ग्रामपंचायत कार्यालयात पञकार दिन उत्साहात साजरा झाला करण्यात आला.यावेळी सरपंच कमलबाई कडु माळकर व उपसरपंच देवीदास पाटील, ग्रामसेवक श्री.राठोड,भागवत पाटील,विशाल ठाकुर,पवन कोलते,यांनी दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले व जामठी परिसरातील पञकारांना शाल,श्रीफळ व पेन देउन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.