बोदवड येथे ‘जनता कर्फ्यू’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

बोदवड – शहर तथा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून या विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी तालुका व शहर प्रशासन,व्यापारी संघटना यांचेसह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ ला पहिल्याचं दिवशी दि.१९ शनिवार रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बोदवड शहर तथा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.त्यामुळे दि.१६ बुधवार रोजी शहरातील गांधी चौकात नगर पंचायत प्रशासन,महसुल विभाग,पोलीस प्रशासन व शहरातील व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.त्यात शहरात दिनांक १९ व २० रोजी असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आज पहिल्या दिवशी म्हणजे १९ शनिवार रोजी या आवाहानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने आज दिवसभर बंद होती.

Leave A Reply

Your email address will not be published.