जिल्ह्यात आज ७४२ कोरोना बाधित आढळले ; १९ जणांचा मृत्‍यू

1

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच असून कमी होण्याचे नाव घेत नाहीय आहे. जिल्ह्यात आज ७४२ कोरोना बाधित आढळून आले आहे.  त्यामुळे जिल्‍ह्‍यातील बाधितांचा आकडा आता ४३ हजार ३०१  वर पोहचला असून, कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचे प्रमाण देखील कमी होत नाही. जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात १९ जणांचा मृत्‍यू झाल्‍याने एकूण मृतांची संख्या १ हजार ८० वर गेला आहे. हा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. असं असलं तरी आजही आढळून आलेल्या बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण अधिक असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.

आजची आकडेवारी

संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१९६; जळगाव ग्रामीण-१०; भुसावळ-६०; अमळनेर-५६; चोपडा-५८; पाचोरा-१०; भडगाव-२; धरणगाव-४३; यावल-२१; एरंडोल-७, जामनेर-२५; रावेर-२३; पारोळा-११५; चाळीसगाव-६४; मुक्ताईनगर-१८, बोदवड-२४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १० असे एकुण ७४२ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज ८३३ रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ३३६ रूग्ण बरे झाले आहेत.  तर आज १९ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०८० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ८८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

1 Comment
  1. Bhushan says

    Wow
    Plese

Leave A Reply

Your email address will not be published.