बोदवड येथील रांका विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न !

0

विज्ञान प्रदर्शनात तीन गटातून १६० उपकरणांची मांडणी

मल्टी फामी या उपकरणाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस

बोदवड :- येथील न.ह.रांका विद्यालयात पंचायत समिती शि‌क्षण विभाग बोदवड व न.ह.रांका हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अँड.प्रकाशचंदजी सुराणा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक श्री.श्रीकृष्ण कुलकर्णी,श्रीराम बडगुजर,रमेशजी जैन,आनंद जैस्वाल सुभाष शर्मा,बोदवड नगर पंचायत नगराध्यक्षा मुमताजबी हाजी सईद बागवान,गट समन्वयक सौ.मिरा इंगळे,समन्वयक समिती अध्यक्ष, रांका हायस्कूल मुख्याध्यापक आर.जे.बडगूजर, उपमुख्याध्यापक एन.ए.पाटील, उच्च माध्यमिक उपप्राचार्य पी.एम.पाटील,पर्यवेक्षक आर.आर.सोनवणे,श्री.व्हि.बी.सोनवणे,तसेच तालुक्यातील विज्ञान शाखेचे शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षिय सुचना बोदवड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. भास्कर लहासे तर अनुमोदन श्री.पी.जी.राठोड यांनी दिले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना अँड प्रकाशचंद सुराणा यांनी विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेली चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून अधिक वाव मिळत असल्याचे प्रतिपादन केले. सदर विज्ञान प्रदर्शनात १६० उपकरणे मांडली त्यात बायोगॅस, जैविक खते, मानवी शरिराची प्रतिकृती व कार्य,कडधान्यातून मिळणार प्रथिने,प्लास्टिकचे दुष्परिणाम,इत्यादी विषयांना हात घातला. या दोन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप १० डिसेंबर मंगळवार रोजी झाला.या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे हे होते.

सदर विज्ञान प्रदर्शन विद्यार्थी गटातून रांका हायस्कूलचा विद्यार्थी ओम गीते प्रथम,रांका हायस्कूलचा ओजस जैन व्दितीय,जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा बोदवड कु.मन्तीशोनाज ईसाक शहा तृतीय तसेच उत्तेजनार्थ जिल्हा परिषद कु-हा हारदो कु.नम्रता भगत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून बोदवड येथील रांका हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयचा विद्यार्थी पियूष शर्मा प्रथम,बोदवड येथील रांका हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयचा प्रतिक महाजन व्दितीय,बोदवड येथील सर सत्यजित नेमाडे विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आकांक्षा गावंडे,तृतीय तसेच उत्तेजनार्थ एणगाव येथील गो.दे.ढाके माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.स्नेहल फिरके,

प्राथमिक शिक्षक गट जिल्हा परिषद उर्दु मुलांची शाळा समीना बेगम शे.बशीर, माध्यमिक शिक्षक गट चि.स.महाजन माध्यमिक विद्यालय जामठी अमितकुमार परखड,लोकसंख्या शिक्षण गट माध्यमिक शिक्षक बी.टी.बावस्कर,प्रयोगशाळा सहाय्यक श्री.सागर खूटे न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड आदींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जळगाव जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक चौधरी व प्रा.जे.एन.राऊळ यांनी तर आभार ए.आर.पाटील व प्रथा.ए.टी.दांदडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान प्रदर्शन प्रमुख बी.आर.खडसे,प्रा.पराग जोशी,आर.एस.देवकर, विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.