बोदवड येथील न.ह.राका हायस्कूलचे संजय निकम यांची कोच म्हणुन निवड

0

बोदवड – अँम्युअर इंडियन डेव्हलपमेंट फेडरेशनच्या मान्यतेने इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा नेपाळ येथील पोखरा या ठिकाणी ज्युनिअर व सिनिअर गटाच्या स्पर्धा दि.१० जानेवारी २०२० ते १३ जानेवारी २०२० या कालावधी दरम्यान होत आहे.त्या स्पर्धेत भारताचा कब्बड्डीचा मुलांचा संघ सहभागी होणार आहे.

त्या संघाचे कोच म्हणुन न.ह.रांका हायस्कुल बोदवड येथील क्रीडा शिक्षक संजय राजधर निकम यांची निवड फेडरेशनचे सचिव के.रंजितकुमार रेड्डी यांनी केली आहे.त्याबद्दल त्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री मिठूलाल अग्रवाल,उपाध्यक्ष अजय जैन,सचिव विकास काेटेचा,जेष्ठ संचालक अँड.प्रकाशचंद सुराणा,माध्य.पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड,काँस्ट्राईब मा.शि.सं नाशिक विभागीय अध्यक्ष प्रभाकर पारवे,महासंघाचे जि.अध्यक्ष रविंद्र तायडे,शा.शि.सं.वि.अध्यक्ष प्रदिप साखरे,न.ह.राकाचे मुख्याध्यापक आर.जे.बडगुजर उपमुख्याध्यापक एन.ए.पाटील उपशिक्षक आर.के.तायडे सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.