#Video : जिल्हा परिषदेच्या सभापती निवड प्रसंगी राडा

0

जळगाव : आज जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडी प्रसंगी दोन गटात राडा झालाय. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या गटात जिल्हा परिषदेतच राडा झालाय.

सभापती पदाच्या चार जागांसाठी नाव निश्चितीसाठी काल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये दोघांच्या समन्वयातून नाव निश्चित करणयात आले आहे. मात्र, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप झाला. त्यामुळे दोन गटात जिल्हापरिषदेमध्येच बाचाबाची झाली.

रवींद्र पाटील आणि उज्ज्वला प्रशांत पाटील यांनी बंडखोरी करत सभापती आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले.यावेळी भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, नंदू महाजन, गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्रामगृहावर चला, असं सर्व जण सांगत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. आम्हाला डावललं गेलं आहे, इतकंच त्यांचं म्हणणं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.