बोदवड येथील ति.र.बरडीया मराठी शाळेत ‘कोरोना’ विषयक जनजागृती

0

बोदवड (प्रतिनिधी) :– संपुर्ण जगात धुमाकुळ घातलेल्या ‘कोरोना विषाणू’ बद्दल विविध शाळा,महाविद्यालय,सार्वजनिक ठिकाण,यांसह विविध सामाजिक संघटना,शासन स्तरावरून जनजागृती करून या विषाणूची लक्षणे व घ्यावयाची काजळी याबाबत माहिती दिली जात आहे.याच पार्श्वभूमीवर बोदवड शहरातील ति.र.बरडिया मराठी शाळेत दि.१३ शुक्रवार रोजी या ‘कोरोना व्हायरस’ बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू विषयी माहिती देत विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लक्षणे व तो होवू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी विषयी शाळेचे उपशिक्षक संदीप पारधी यांनी विद्यार्थांना सविस्तर माहिती सांगितली.तसेच हात धुण्याच्या विविध पद्धती व स्वच्छ हात धुण्याचे फायदे या विषयी सविस्तर माहिती उपशिक्षिका सविता वंजारी यांनी यावेळी सांगितली तर शाळेचे उपशिक्षक श्री.बावणे सर,श्री.निकम सर,श्री.वंजारी सर,उपशिक्षिका सुवर्णा पाटील,उपशिक्षिका तायडे मॅडम,बडगुजर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

हात रुमाल व हात धुण्यासाठी साबण,हँड वॉश ने स्वच्छ हात धुऊन जेवण करावे हा एक उपक्रम यावेळी उपशिक्षक संदीप पारधी यांनी आपल्या वर्गात राबविला.या उपक्रमाचे कौतुक करीत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.काठोके मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत श्री.वंजारी यांचे अभिनंदन केले.
तर इतरही शिक्षकांनी आपापल्या वर्गात असा उपक्रम राबवावा असे आव्हान यावेळी मुख्यध्यापिका श्रीमती काठोके यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.