फारूख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका !

0

श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची नजरकैद मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कलम ३७० हटविल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी फारूक अब्दुल्ला यांना घरातून अटक करण्यात आली. यानंतर, १५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांनी त्यांना नजरकैदेतून सोडण्यात आले.


जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्य सचिव योजना रोहित कंसाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून फारूख अब्दुल्ला यांची नजरकैद संपुष्टात आल्याच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध केली आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, सीपीएम नेते सीताराम येचुरीसह इतर सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची नदरकैद रद्द करावी अशी मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.