बोदवड तालुक्यातील चार ग्रामसेवकांचे निलंबन

0
गटविकास अधिकारी आर.ओं वाघ यांनी केली निलंबनाची कारवाई
बोदवड – तालुक्यातील चार ग्रामसेवकांवर कर्तव्यात कसूर व कामात केलेल्या दिरंगाईमुळे बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ यांनी दि.23 डिसेंबर २०१९ रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.यात वरखेड खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुरेश दत्तात्रेय राजहंस,जुनोना दिगर चे ग्रामसेवक गणेश रामसिंग चव्हाण,चिंचखेड सीम व नांदगावचे ग्रामसेवक राहुल नारायण पाटील,धोंडखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक सुभाष रामलाल कुंभरे हे चारही ग्रामसेवक पंचायत समिती बोदवड अंतर्गत कार्यरत होते चारही ग्रामसेवक पंचायत समितीच्या ग्रामसेवकांच्या मासिक पाक्षिक सभांना अनधिकृतपणे गैरहजर राहणे, कार्यालयीन आदेशाची अवमान करणे,वरिष्ठ कार्यालयातून मागितलेली माहिती वेळेवर सादर न करणे,स्वच्छता भारत शाश्वत आराखडा तयार न करणे,प्रिया स्पोट लेखे बंद न  करणे,११ अज्ञावली डाटा एंट्री न करणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक रोह्यो कृती आराखडा सादर न करणे, संपूर्ण घरकुल अहवाल अपूर्ण घरकुल पेपरलेस ग्रामपंचायत अहवाल सन २०१९ चे  अंदाजपत्रक सादर न करणे, पाणीटंचाई अहवाल आपले गाव आपला विकास कृती आराखडा आणि पेंडिंग घरपट्टी पाणीपट्टी वसुली कामगार अपूर्ण इत्यादी बाबतीत कर्तव्यात कसूर करत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने वरील चारही ग्रामसेवक यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आलेले असल्याने शिक्षा १९६४ मधील नियम ३ व ४ नुसार शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने त्यांच्यावर बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  रमेश वाघ यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.त्यामुळे तालुक्यात या कारवाईने कर्तव्यात कसूर करणाऱ्या व दांडीमार ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.