पंचशील नगरात मायलेकींना लाकडी दांडाक्याने मारहाण

0
चाळीसगाव प्रतिनिधि – मुलाची मोटारसायकल घेतल्याचा राग येऊन महीला व मुलीने शेजारीच राहणाऱ्या मायलेकींना शिवीगाळ देवून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने महिलेच्या हाताची करंगळी मोडल्याची घटना दि 3 रोजी शहरातील पंचशील नगरात घडली असून मुलीसह महिलेवर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत माहीती अशी शहरातील पंचशील नगरमधील सौ रेखाबाई चंद्रकांत कदम (42) या त्यांच्या घरासमोरील वसुंधरा रमेश निकम व त्यांची मुलगी आरती या त्यांच्या जवळ येवून आमची मोटारसायकल तुमचा मुलगा का घेवून गेला तुमची लायकी आहे का असे म्हणून शिवीगाळ करत तुम्हाला जास्त झाले आहे तुम्ही येथे कसे राहतात ते बघते असे म्हणून आरतीने तिच्या हातातील लाकडी दांडा त्यांच्या डोक्यावर, पाठीवर व डाव्या हाताच्या करंगळी वर मारून करंगळी फ्रॅक्चर केली त्यावेळी मुलगी प्रियंका बोलण्यास गेली असता तिला दोघी मायलेकींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व लाकडी काठीने मारहाण केली व तुझ्या दोन्ही मुलांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून केसमध्ये अडकवून टाकू अशी धमकी दिली त्यावेळी झटापटीत रेखाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले आहे याप्रकरणी सौ रेखाबाई कदम यांच्या फिर्यादीवरून वसुंधरा रमेश निकम, आरती रमेश निकम यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गु र न 1/2020 भा द वि कलम 325, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक अजय भोई करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.