बोढरे येथील बालकाच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात, गुप्त धन लालसेने खून

0

चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यातील बोढरे  येथील ऋषिकेश पंडित सोनवणे या आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याला ठार मारून त्याचे प्रेत एका गोणीत भरून मृतदेह कन्नड घाटाच्या पायथ्याशी दस्तुरी फाट्याच्या पुढे एका नाल्यात फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार चाळीसगाव तालुक्यात घडला होता.

या खून प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ग्रामीण पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून या खुनाचे गुढ शोधून काढल्याचे कळाले असून तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते. बालकाच्या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी सुमारे एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

तालुक्यातील बोढरे  येथील आठ वर्षे बालक ऋषिकेश पंडित सोनवणे हा दिनांक 28 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचे वडील पंडित सोनवणे यांच्याकडून दोन रुपये घेऊ चॉकलेट घेण्यासाठी दुकानात जातो असे सांगून घरून गेला होता. त्यानंतर त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद त्याचे वडील पंडित रामदास सोनवणे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार किशोर सोनवणे करीत होते तपास सुरू असतानाच ग्रामीण पोलिसांना कन्नड घाटात दस्तुरी फाट्याजवळ एका बालकाचे गोणपाटात प्रेत असल्याची माहिती  मिळाली .घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूर वाड, हवालदार किशोर सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन ते प्रेत ताब्यात घेतले

त्यावेळेस प्रेताचा स्पोट पंचनामा करताना बालकाचे निर्घुणपणे शरीरातील अवयव काढून  व कापून टाकल्याचे आढळून आल्याने या बालकाचा निर्घुन खून  नरबळी प्रकारातून  झाला असावा असा अंदाज पोलिसांना आल्याने पोलिसांनी आपली तपासाची दिशा ही नरबळी च्या दिशेने ठेवल्याने पोलिसांना या चाळीसगाव तालुक्यात खळबळ माजून देणाऱ्या  खून प्रकरणातील आरोपी पर्यंत पोहोचण्यात यश आले आहे .आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू असल्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही परंतु हा खून गुप्तधनाच्या लालसेतून  झाला असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.