चाळीसगाव महाविद्यालयात विविध उपक्रमांचे उद्घाटन !

0

चाळीसगाव :- येथील बी.पी. आर्ट्स एस एम सायन्स के  सी कॉमर्स महाविद्यालय आणी के.आर.कोतकर ज्यूनीयर महाविद्यालहृयात  चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्डचे चेअरमन  माननीय नारायणदास  अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध विकास  कामांचे त्यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, ॲड प्रदीप अहिरराव, मु.रा अमृतकार, क.म राजपूत, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन नानाभाऊ कुमावत, अशोक बाबूलाल वाणी ,प्रशिल आग्रवाल  योगेश राजधार पाटील,अँड. धनंजय ठोके, अॅड .पूष्कर कुलकर्णी, प्राचार्य डॉ मिलिंद बिलदिकर, उन्मेष संपादक प्रा. डी एल वसईकर इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.

चाळीसगाव महाविद्यालयात मीडिया रूम, गणित विभागातील डिजिटल क्लास रूम, जैव तंत्रज्ञान पोस्टर प्रदर्शन, महाविद्यालयाचे  नियतकालीक उन्मेष प्रकाशन, रक्तदान शिबिर , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , सी. सी टी व्ही, एक्सटेन्शन , ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींना मोफत बस पासेस चे वितरण, ज्युनिअर कॉलेज मधील नवीन संगणकीकृत सुविधा कक्ष तसेच भौतिक रसायन शास्त्र, प्रयोगशाळा यांचे  मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायनदास अग्रवाल यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलींद  बिल्दीकर यांनी महाविद्यालयात झालेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा उपस्थितांन समोर मांडला.  या प्रसंगी आपल्या मनोगतात नारायण भाऊ म्हणाले की, संस्थेच्या विविध शाखांमध्ये होणाऱ्या विविध विकास कामे करण्यासाठी माझ्या शरीरात उर्जा  संचारते व मला मनस्वी आनंद होतो तसेच आपण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना केलेल्या कार्याचा लेखाजोखा महाविद्यालयाच्या उन्मेष या अंकात असणार आहे. म्हणून हा अंक आपल्या जीवनात संग्रहित करून ठेवला पाहिले अस मला वाटते. कारण, एकदा महाविद्यालयाचा अंक हा त्या महाविद्यालयाचा संपूर्ण दर्शन घडविणारा असतो. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. किरण गंगापूरकर यांनी केले व  उपस्थितांचे आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.