राजपूत समाजाच्या ऐक्यासाठी गुणगौरव सोहळयाची गरज-विलास भाटकर

0

भुसावळ : भुसावळ विभागातील राजपूत समाजाच्या ऐक्यासाठी गुणगौरव सोहळ्यासारखे कार्यक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज असून त्यामुळे समाजाच्या ऐक्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न हा प्रेरणादायी असून यासारखे उपक्रम समाजाने राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी केले.ते राजपूत समाज संघर्ष समितीतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. वांजोळा रस्‍त्‍यावरील स्टार रीसॉर्ट येथे झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खडक्याचे उद्योजक सुरजसिंग पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेंद्र पाटील,पत्रकार संजयसिंग चव्हाण,विक्रांतसिंग महाजन, मनोरंजनसिंग राजपूत आदी उपस्‍थित होते. प्रसंगी मान्यवरांच्या समाजातील गुणवंतांना गौरवण्यात आले.   या कार्यक्रमाचे

प्रास्ताविक भगतसिंग पाटील तर सूत्रसंचालन डी.एन.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन बी.एन.पाटील यांनी मानले. यावेळी राजपूत संघर्ष समितीचे संयोजक प्रवीणसिंग पाटील, आयोजन समितीचे बी.एन.पाटील, अशोक पाटील, कृष्णा पाटील, यशवंत चौधरी, दीपक राजपूत, सुनील चौधरी, हर्षल पाटील, सुपडूसिंग महाजन, दिवाणसिंग राजपूत, चंदू बोरसे, पवन पाटील, चंदू चव्हाण, सोनी ठाकूर, अमोल पाटील, सुरेंद्र पाटील, प्रमोद चौधरी, संदीप भोळे, गोपीसिंग राजपूत, भीमसिंग पाटील, रवींद्र पाटील, युवराजसिंग पाटील, दिनेश चौधरी, भाग्येश चौधरी, आशुतोष चौधरी, तुषार पाटील व इतर समाजबांधव महिला भगिनी व व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.