बैलाने रिक्षास धडक दिल्याने चहार्डीतील तरुण जागीच ठार; एक जखमी

0

चोपडा :-रिक्षास बैलाने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात कैलास भिकन पाटील (वय-३२) रा.चहार्डी हाया तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना चोपडा ते शिरपूर दरम्यान अकुलखेडा गावाजवळ हॉटेल संकेत समोर ९ रोजी सकाळी ८ वाजता घडली.

चहार्डी येथून पॅजो रिक्षा क्र.एम.एच. १८ व्ही ४०६ ही चोपडा शहराकडे येत होती. यावेळी गुरांचा कळप रस्ता पार करीत असताना पॅजो रिक्षास बैलाने धडक दिल्याने अपघात होऊन रिक्षा पलटी झाली. त्यात कैलास पाटील (वय-३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर मुक्ताबाई भरत परमार रा. चहार्डी या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत कैलास पाटील हा चहार्डी येथून सकाळी चोपडा येथील मालती हॉस्पिटल येथे कामाला येत असताना रिक्षाच्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते कंपाउंडर म्हणून कामास होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.