बीएचआर घोटाळा प्रकरण; दोघा संशयितांना जामीन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वात जास्त चर्चेत असलेले  बीएचआर  सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जितेंद्र कंडारे याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे.

बीएचआर पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले विवेक ठाकरे व सुजीत वाणी या दोघांचा जामीन मंगळवारी न्यायालयाने मंजूर केला. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी जळगावात छापेमारी केली. यावेळी ठाकरे, वाणी यांच्यासह सहा संशयिताना अटक केली होती. दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सर्वांची न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून संशयित येरवडा कारागृहात बंदी होते.

यातील विवेक ठाकरे याने पावत्या मॅचिंग करण्याचे काम केले. तर, सुजीत वाणी या पतसंस्थेच्या कर्मचार्‍याने ठेविदारांना धमकावल्याचा त्यांचावर आरोप आहे. या दोघांनी आधी जामीनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. यानंतर या दोघांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले. यावर सुनावणी पूर्ण होऊन मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयात दोघांच्या जामीन अर्जांवर दोन महिने सुनावणी झाली. यानंतर मंगळवारी दोघांना जामीन मंजूर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर दोघांची ६ ऑगस्ट रोजी कारागृहातून सुटका होऊ शकणार आहे. ठाकरे याच्यातर्फे ऍड. गिरीश नागोरी यांनी काम पाहिले.

दरम्यान, याच प्रकरणात अटकेत असलेल्या जितेंद्र कंडारे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर मुख्य संशयित सुनील झंवरने तिसर्‍यांदा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून या दोघांच्या अर्जांवर सुनावणी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.