बिहार पाठोपाठ मध्यप्रदेशातही कॉंग्रेसला जोरदार धक्का ; भाजपची 20 जागांवर आघाडी

0

भोपाळ – मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस 7 आणि बीएससी एक जागेवर आघाडीवर आहे. तसेच बिहारमध्येही भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारनंतर आता मध्यप्रदेशातही काॅंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

भाजप नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून भाजपच्या उमेदवारांचं अभिनंदन केलंय. तसेच त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विटद्वारे राज्याच्या जनतेचे आभार मानलेत. ‘जनतेने पुन्हा एकदा विकास आणि जनकल्याणचा संकल्प ठेवणाऱ्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी दिली, हे स्पष्ट दिसतंय,’ असं ट्विट करत त्यांनी जनतेचे आभार मानले.

मार्चमध्ये काॅंग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. काॅंग्रेसची संख्या कमी झाल्याने राज्यातील सरकार पडलं होतं. 25 आमदारांचा राजीनामा आणि तीन आमदारांचं निधन यामुळे रिक्त झालेल्या 28 जागांवर 3 नोव्हेंबरला पोडनिवडणूक घेण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.