धक्कादायक : पारोळ्यात २० वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करून पाजले विष

0

पारोळा :  तालुक्यातील टोळी येथील 20 वर्षीय तरुणीवर 3 तरुणांनी सामुहिक बलात्कार करत विष पाजून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत तरुणीच्या नातेवाईंकांनी केला आहे. या प्रकरणी पारोळ्यात खळबळ माजली असून नातेवाईं व समाजीक संघटनेने सदर घटनेची सीआयडीचौकशीची मागणी केली आहे. तर दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोळी गावातील २० वर्षीय पिडीता ही वाय.एस.वाय. बी. एस सी चे शिक्षण पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात घेत होती. तिच्या वडीलांचे निधन झाले असून ती आपली आई दोन बहीण, दोन भाऊ यांच्यासोबत टोळी येथे राहत होती. 7 रोजी ती आपले मामा सुरेश पाटोळे यांच्या कडे पारोळा येथे दिवाळी साठी आली होती. कामानिमित्त मामा सकाळी घरा बाहेर गेले व गेल्यावर बाहेर औषधी आणण्यासाठी जाते असे सांगून गेली असता ती परत न आलीच नाही. मामाने शोध घेतला असता पारोळा पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान दुसऱ्या दिवशी बेपत्ता तरूणी बसस्थानकाच्या मागे बेशुध्दावस्थेत आढळून आली. काही नागरीकांना तिला बेशुध्दावस्थेत तातडीने धुळे रूग्णालयात हलविण्यात आले. आज पहाटे पिडीत तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलीवर बलात्कार करून तिला विषारी औषध देण्यात आल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला आहे. पीडित मुलीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. मेडीकल रिपोर्ट नुसार मुलीवर दोन ते तीन जणांना सामुहिक बलात्कार केला असून पाण्यात विष देवून पाजण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पिडीताचे मृतदेह नातेवाई व समाजीक संघटनेनांनी पारोळा येथे आज आणत पारोपाळा पोलिस ठाण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राकेश जाधव आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तर नातवाईंकांनी याप्रकरणी सीआयडी चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.  दरम्यान, याप्रकरणी 2  संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.