बिहारमध्ये एनडीएचे उमेदवार जाहीर

0

नवी दिल्ली ː- १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज बिहारमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त (जदयू) आणि लोकजनशक्ती पार्टी (एलजेपी) यांच्या महायुतीने ४० उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप आणि जेडीयूच्या 17-17 जागा आहेत तर राम विलास पासवान यांच्या एलजेपी सहा जागा लढवणार आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांचे तिकीटही कापण्यात आले आहे. शाहनवाज हुसैन यांनी गेल्या निवडणुकीत भागलपूर येथून निवडणूक लढवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.