निसर्ग मित्र समिती आयोजित राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत वडजी व पिचर्डे विद्यालयाचा सहभाग

0

भडगाव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती तर्फे जल जन जागृती अभियान अंतर्गत माध्यमिक शिक्षक कै.जयेश सुरेश अहिरे यांच्या स्मरणार्थ भडगाव तालुका निसर्ग मित्र समिती कडुन भडगाव तालुक्यात वडजी व पिचर्डे या केंद्रावर राज्यस्तरीय निसर्ग चित्र रंगभरण व पर्यावरण ऩ्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वडजी येथील टि.आर.पाटील विद्यालय व पिचर्डे येथील जिजामाता माध्यामिक विघालयात येथे रंगभरण स्पर्धेचे परिक्षा घेण्यात आली होती
वृक्ष,पाणी व पर्यावरण विषयी विद्यार्थ्यांना आपुलकी व्हावी या उद्येशाने निसर्गमित्र समिती तर्फे १५ वर्षापासून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्र भर आयोजित करण्यात आली आहे. यात भडगाव तालुक्यातील वडजी केंद्रावर टि.आर पाटील विद्यालयात परिक्षा घेण्यात आली.

यात वडजी ,पाढरंद,या गावातील ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तर पिचर्डे केंद्रावर जिजामाता माध्यामिक विघालयात पिचर्डे व बात्सर गावातील १२५ विघार्थी परिक्षेस बसले होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निसर्ग मित्र समितीच संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, भडगाव निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील, निसर्ग मित्र समितीचे ता.सल्लागार व जिजामाता माध्यामिक विघालयाचे मुख्खाध्यापक दिपक बोरसे सर, वडजी येथील टि.आर पाटील विघालयाचे मुख्खाध्यापक डि.डी पाटील सर, वडजी विघालयाचे कलाशिक्षक वाय.ए.पाटील, इंग्लीस मेडीअमचे मुख्याध्यापक कैलास मोरे, उपशिक्षक किरण पाटील, एम.ऐ.भदाणे, राहुल जाधव, हर्षल पाटील, पिचर्डे शाळेचे उपशिक्षक एस.डी.पाटील, जी.के. देशमुख, कलाशिक्षक अभिजीत पवार, एन.एच. सोनार, उपशिक्षिका एल.एम.पाटील, के.डी.सोनवणे, लिपीक संजय पाटील, शिपाई संभाजी पाटील, ज्ञानेश्वर देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.