बालिकेवर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे

0

घटनेच्या निषेधार्थ शहरातून मूकमोर्चा ; जिल्हाधिकाऱयांसह पोलीस अधीक्षकांना निवेदन
जळगाव;- जळगाव शहरातील समता नगर भागात आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्या प्रकरणी आरोपीला कठोर शासन व्हावे तसेच तिच्या कुटुंबियांना शासनाकडून संरक्षण आणि आर्थिक सहायय मिळावे , हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी आदी मागण्यांसाठी आज विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयावर मूकमोर्चा काढण्यात आला . यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले . यावेळी आ. राजूमामा भोळे ,महापौर ललित कोल्हे ,संदीप ढंढोरे , कल्पना पाटील अरुण चांगरे ,अजय घेगट , शिवचरण ढंढोरे, जितेंद्र चांगरे,जयप्रकाश चांगरे,दिलीप चांगरे ,चेतन संकट,विशाल जावळे,निलेश ससाणे,लेखन सांगळे,प्रेमचंद आठवाल ,अमोल तांबोळी,सुभाष हंसकर,बदल दाबोरे,नितीन जावळे , मधुकर गोयर,किसन पवार,विजय चावरे,रवी खरारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.