बालके व झाडांच्या काळजी पोटी दोघे आदर्श शिक्षक शाळेवर

0

पारोळा (प्रतिनिधी) : वृक्षतोड कामावरील मजुर गावात परत आल्याने त्यांच्या सोबत गेलेले ११ बालके , गावातील बालके व आदिवासी गौरव दिना निमित्त ऑगस्ट महिन्यात लावलेल्या झाडांच्या काळजीपोटी, त्यांच्या चौकशी साठी व देखभाल बाबत उपाय योजना करण्यासाठी जि प प्राथ शाळा धाबेचे राज्य शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा फुले गुरू गौरव आदर्श पुरस्कार विजेते गुणवंतराव पाटील यांनी शाळा व गावात भेटी दिल्या.

चार दिवसापुर्वी शाळेतील शिल्लक धान्य साठा त्यांनी वाटप केला . त्यावेळी ही बालके आपल्या पालकांसह गावापासुन लांब शेतावर मुक्कामाला होते . त्यामुळे भेट झाली नव्होती .आज त्या बालकांना भेटुन व काही ग्रामस्थांना भेटुन चौकशी केली . काळजी दक्षता घेण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले .आज तरी गावात परिस्थिती उत्तम व कोणीही आजारी नाही .

तसेच शाळा शिक्षक , विदयार्थी व ग्रामस्थ यांनी जागतिक आदिवासी दिना निमित्त ऑगस्ट महिन्यात  शाळा परिसरात काही लिंबाची झाडे ट्री गॉर्डसह लावली होती . उत्तम देखभालीमुळे ती चांगली जगली आहेत . सध्या लॉक डाऊनच्या काळात त्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ट्री गॉर्ड परत व्यवस्थित करून पाणी टाकुन नियमित दोन दिवसा आड शाळेवर जाऊन शिक्षक झाडांना पाणी टाकुन गांवातील परिस्थितीवर लक्ष ठेवुन असणार आहेत . बालक आणि झाडे हीच खरी उदयाची राष्ट्राची संपत्ती आहेत . त्यांचे जतन , संवर्धन व वर्धापन करणे आपले कर्तव्य आहे अशी भावना मुख्याध्यापक साळुंखे यांनी व्यक्त केली .

Leave A Reply

Your email address will not be published.