जामनेरात महाराष्ट्र बँके समोर गर्दी ,संचात बंदीचे तीनतेरा

0

जामनेर (प्रतिनिधी):- देशात कोरोना मूळे  टाळेबंदी व संचार बंदी लागू असताना देखील जामनेर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बाहेर ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

सरकारने काही दिवसापूर्वी महिलांच्या जन धन खात्यात ५०० रुपये जमा करणे व गॅस सिलिंडर अनुदान जमा करण्याचे काम सुरू केले असून आज जामनेर येथे ते पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.

शासनाने व प्रशासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी काही नियमावली तयार करून त्या नुसार पैसे वाटप करण्याचे धोरण जाहीर केले आहे.

परंतु बँकेत कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने  ग्राहकांच्या गर्दीने दिसून आहे .या बँके जवळच हाकेच्या अंतरावर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आहे.पण तेथील कोणताही अधिकारी या ठिकाणी येऊन देखील तपास करतांना दिसून आला नाही.

या अशा गर्दी मूळे कोरोना चा प्रसार होण्याचे चांसेस जास्त आहे. बँक व्यवस्थापनाने व प्रशासनाने ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जनतेने कोरोना सारख्या महामारिच्या साथीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या मुळे आपण स्वतः गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.