बारावीच्या गुणपत्रिकांचे शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना वाटप

0

जळगाव : नाशिक विभागीय मंडळ कक्षेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च परीक्षेच्या (इयत्ता बारावी) कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व इतर साहित्य जिल्ह्यातील ४ वितरण केंद्रांवर गुरूवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप केल्या जाणार आहे.

पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन जाहीर झाला असून त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ८९.७२ टक्­के लागला आहे. यंदाही निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत़ बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धावपळ सुरू होते ती पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची़ मात्र, मुळ गुणपत्रिकाचं न मिळाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहे़ मुळ गुणपत्रिका महाविद्यालयात जमा करताचं, प्रवेश निश्चित केले जाणार आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा होती़ ती प्रतीक्षा आता संपली असून शुक्रवार, ३१ जुलैच्या दुपारी ३ वाजेपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे़ दरम्यान, गुणपत्रिका वाटप करत असताना कुठलीही गर्दी होणार नाही, याची काळजी महाविद्यालयांना घ्यावी, तसेच सोलश डिस्टन्सिंग पाळण्यात याव्या, आदी सूचना नाशिक विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे़.

Leave A Reply

Your email address will not be published.