चिनावल प्रा.आ.केद्राचे आरोग्य सेवक कोरोना पाॅझिटीव्ह

0

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : गेल्या चार महिन्यांपासून गावात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गावातील नागरिकांना कोरोना बद्दल जनजागृती निर्मूलनासाठी आरोग्य विषयक सूचना व सर्व्हेक्षण करून कोरोना रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याचे अहोरात्र कार्य करणारे चिनावल प्रा.आ.केद्राचे एकआरोग्य सेवकच आज कोरोना बाधित आले आहे.

सदर आरोग्य सेवक सलग ४ महिन्यांपासून गावात वेद्यकिय अधिकारी , कर्मचारी , ग्रामपंचायत प्रशासन , महसूल प्रशासन सोबत कोरोना निर्मूलन व कोरोना साखळी तोडणे कामी कार्यरत होते.  मात्र त्यांनी दि.२८ रोजी फैजपूर कोविड सेंटर वर स्वताहून टेस्ट केल्याने त्यात ते पाॉझीटीव्ह आले आहे व तेथेच त्याचेवर उपचार करण्यांत येत असल्याचे त्यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.