बांभोरी गावाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला भरघोस निधी

0

बांभोरी, लोकशाही न्युज नेटवर्क

एरंडोल कासोदा येथून जवळच असलेल्या व एक प्रभाग देखील नसलेल्या अगदीच लहान बांभोरी या खेड्यात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली, यावेळी पाटील यांनी गावातून जाणाऱ्या नाल्यांच्या पूलासाठी २५ लाख रुपये निधी देखील दिला आहे.  या गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झालीत, पण कोणताही मंत्री या गावाने पाहिलेला नव्हता.  गुलाबराव पाटील हे पहिलेच मंत्री आहेत की, त्यांनी या गावाला भेट तर दिलीच पण या गावाची रस्त्याची अडचण कायमची दूर केली आहे.

फक्त १८० मतदार असलेले व राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित  हे गाव. मतदार संख्या अत्यल्प असल्याने या गावासाठी विकास कामांसाठी मोठा निधी आजतागायत मिळालेला नाही.  या गावात जाण्यासाठी रस्ता देखील जेमतेम आहे.  एरंडोल ते कासोदा या राज्यमार्गावर येण्यासाठी एक नाला आडवा येतो.  या नाल्याला पूर आला की गावाचा संपर्क तूटतो, शेतकऱ्यांचे या नाल्यातून बैलगाडी नेतांना मोठे हाल होतात. या सर्व समस्या जाणून घेऊन मतदार संघ नसतांना व अत्यंत लहान खेडे असतांना देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नाल्यावरील पूल व एक कि.मी. डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये एवढा भरघोस निधी देऊन या कामाचे नारळ वाढवून शुभारंभ केला आहे.

याप्रसंगी  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,  जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल माने, तालुकाध्यक्ष वासूदेव पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, जगदीश पाटील, रविंद्र चौधरी, उमेश पाटील, राजेंद्र वाणी, स्वप्नील बियाणी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  गावातील पोलिस पाटील यांच्यासह सर्वच नागरिक व भगीनींनी मंत्र्यांचे स्वागत केले.  प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र चौधरी, राजेंद्र वाणी, भगवान खैरनार, नारायण पाटील, गोपीचंद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.