बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी

0

जळगाव

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तापमान ४० अंशाच्या पलीकडे पोहोचले होते. जुलै महिन्यात पहिल्यांदाच पारा ४० अंशाच्या पार गेल्याने नागरिकांना मे हिटचा अनुभव आला. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पारा उतरला असून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर आज शुक्रवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.

पाऊस नसल्याने  दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशा चिंतेने शेतकरी राजा चिंताग्रस्त होता. बुधवारपासून अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने सायंकाळी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पारा ४० अंशाच्या खाली आला असून २५ ते ३० अंश सेल्सिअसमध्ये स्थिरावला आहे. आज शुक्रवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांना या वातावरणाने दिलासा मिळाला असला तरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.