बर्‍हाणपुर येथील श्री कालिका मंदिर संस्थानाचा वार्षिक स्थापना शताब्दी महोत्सव सुरू ~११रोजी नवमीचा भव्य दिव्य सोहळा

0

 

जळगाव दि.4 :-

बर्‍हाणपूर येथील चितौडा वाणी समाज संचलित श्री कालिका पद्मावती देवी मंदिर संस्थानाचा वार्षिक स्थापना शताब्दी महोत्सव 4 ते 11 दरम्यान  बर्‍हाणपूर (म.प्र.) येथील श्री कालिका पदमावती देवी मंदीर महाजनापेठ येथे साजरा होत आहे.मंगळवारी 11 रोजी नवमीचा भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व समाज बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

चितोडे वाणी समाज बऱ्हाणपूर च्या बंधू-भगिनींव्दारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बर्‍हाणपूर येथील सूर्यपुत्री तापी नदीकाठावर चितोडे वाणी समाजाची अराध्यदेवता माता कालिका देवी समाज मंदिराची स्थापना सन 1920 साली उभारणी करण्यात आली. 100 वर्षांपासून परंपरेने समाजातर्फे भक्तीभावाने प्रतिवर्षी चैत्र शुध्द प्रतीपदेपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी माता भगवतीच्या कृपेने वार्षिक स्थापना दिवस आठ दिवस महोत्सवाव्दारे साजरा करीत आहे.

यावर्षी श्री चितौडा वाणी समाजाव्दारे श्री कालिका पदमावती देवी शताब्दी महोत्सव 4 ते 11 जून पर्यंत साजरा करीत आहोत. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ ध्यावा, अशी विनंती चितैाडा वाणी समाज बऱ्हाणपूर तर्फे करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :-
दि. 4 ते 10 दररोज
पहाटे 06 ते 7.30 पर्यंत समाज बंधू-भगिनीव्दारे प्रभातफेरी
सकाळी 7.30 वाजता आरती
रात्री 9.30 वाजता गरब्याचे आयोजन,
दि.7 ज्येष्ठ शुध्द पंचमी (शुक्रवार) ~
सायं. 7 वाजता समाजातील 100 महिला-पुरू षांव्दारा  देवी शप्तशति पाठाचे वाचन,
दि.8 रोजी रात्री 9 वाजता सुंदरकांड व (रात्री भोजनाची व्यवस्था मंदिरात केली आहे.)
दि.9 रोजी ब्राह्मणांव्दारे शप्तशति पाठाचे वाचन रात्री 8 वाजता भजनसंध्या (सकाळ,संध्याकाळची भोजन व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे.),
दि.10 रोजी
संध्याकाळ  7.30 वाजेपासून 12 पर्यंत हवन-पूर्णाहुती, दुपारी 2 वाजेपासून बेटी संमेलन, सायं.6 पासून समाजातील बंधुभागिनी द्वारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
(दोघीवेळेचे जेवण मंदिरात राहिल.)

दि. 11 ज्येष्ठ शुध्द नवमी(मंगलवार) रोजी भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 7.30 वाजता देवीची प्रात: आरती,
युवा शक्तीव्दारे वाहन रॅली,
8 वाजता  ध्वजा घेऊन घोड्यावर बसण्याची बोली,
8.30 वा. देवीची भव्य शोभा यात्रा,
11 वा. शोभायात्रेचे मंदिराच्या प्रांगणात समारोप,
त्यानंतर माताजींचे पूजन व मंदिराच्या कळसावर ध्वजा चढविण्याची बोली,
तदनंतर कार्यक्रमाला विविध ठिकाणाहून आलेल्या समाज व मंडळ अध्यक्षांचा सत्कार-सन्मान,
त्यानंतर बर्‍हाणपूर परिक्षेत्रातील 10 वी व 12 वी परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा व ज्येष्ठांचा सत्कार , माताजींच्या पूजनानंतर श्रृंगार व 56 भोगाचे दर्शन, महाआरती, महाप्रसाद व 56 भोगाचे प्रसाद वितरण होणार आहे.
बऱ्हाणपूर येथे सुरु असलेल्या या भव्य दिव्य मोहोत्सवास चितोडे वाणी समाजातील सर्वच अबाल वृद्ध समाजबंधु भगिनींनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.