मू.जे. महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण

0

जळगाव दि.4 -मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी एफ.वाय. बी.ए., एफ.वाय. बी. कॉम, एफ. वाय.बी. एस्सी. एफ. वाय.बी.व्हीओसी ह्या वर्गांसाठी प्रवेश घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

दि. 6 जुन ते 15 जुन दरम्यान ऑनलाईन फॉर्म जमा करणे,

दि. 19 जुन रोजी अस्थायी गुणवत्ता सूची सादर करणे,

दि. 21 जुन रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काही तक्रारी आल्यास जमा करणे

दि. 22 जुन रोजी अस्थायी गुणवत्ता सूची सादर करणे, पहिली फेरी

दि. 24 जुन ते 28 जुन दरम्यान पहिली फेरी प्रवेश

दि. 1 जुलै अस्थायी गुणवत्ता सूची सादर करणे. दुसरी फेरी

दि. 2 जुलै ते 4 जुलै दरम्यान दुसरी फेरी प्रवेश तर

दि. 8 जुलै रोजी उर्वरित जागांसाठी अंतिम प्रवेश फेरी होणार आहे,असे कळविण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.