बदरखे येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

पाचोरा (प्रतिनिधी) : नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे गावात दि.२१ रविवार रोजी विवाहितेने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्याचे कारण स्पष्ट होत न होते. पतीसह सासू, नणंदेने संगनमत करून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पती नितीन पाटील यास अटक करण्यात आलेली आहे.

तळई ता. एरंडोल येथील माहेर असलेल्या कविता पाटील हिचा नितीन सुभाष पाटील रा. बदरखे ता. पाचोरा याच्याशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. तिच्या पतीने आपल्या आई तसेच बहिणीशी संगनमत करून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती. तसेच मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ८० हजार रुपये आणावे यासाठी ते त्रास देत होते. या छळास कंटाळून अखेर कविताने गळफास घेतला. अशी फिर्याद मृत कविता पाटील हिच्या भावाने पाचोरा पोलिसात दिली असून नितीन सुभाष पाटील (पती), सुरेखा सुभाष पाटील (सासू), निलिमा दिपक पाटील रा. तरवाडे (नणंद), रिंकू (पूर्ण नाव माहीत नाही धरणगाव) नणंद, यांच्या वोरोधात गु. र. नं २३५ / २०२० भा.द.वी. कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे सह नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.