पाचोरा येथे नगरपालिकेतर्फे मास्‍क न वापरणा-यांवर दंडात्‍मक कारवाई

0

पाचोरा (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानूसार शहरातील प्रत्येक नागरिकांनी चेह-यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आलेले असुन मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून रक्कम रुपये ५०० रुपये दंड म्हणुन वसुल करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली आहे. याकामी दि. २४ जुन रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अचानक तपासणी केली असता शहरातील विविध भागातील मास्‍क न वापरणा-या ३४ नागरिकांवर कारवाही करत अदमासे रक्‍कम रुपये २ हजार ५०० रुपये दंड वसुल आकारण्‍यात आला आहे.

त्‍याचप्रमाणे संध्‍याकाळी ५ वाजेनंतर सुरु असलेल्‍या दुकाने / आस्‍थापना यांना देखील सक्‍त सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. सदरच्‍या मोहीमेत पालिकेच्‍या मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, अभियंता मधुकर सुर्यवंशी, हिमांशु जैस्‍वाल, दत्‍तात्रय जाधव, विलास देवकर, सुधीर पाटील, अनिल मेघराज पाटील, महेंद्र गायकवाड, भागवत पाटील, राजेंद्र वाघ, संजय जगताप, गणेश अहिरे, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, गोविंदा पारोचे, सचिन कंडारे आदी कर्मचारी यांचा समावेश होता. यापुढे मोहीम अधिक तिव्र करणार असुन नागरीकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.