अधिकारी वर्गाने ग्राहकांचे होणारे शोषण थांबवावे- विकास महाजन

0

एरंडोल (प्रतिनिधी) : अ.भा.ग्राहक पंचायत एरंडोल तालुक्याची मासिक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा दि.24 जून रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

टाळे बंदी आणि संचारबंदी चा गैरफायदा घेत काही व्यापारी,दुकानदार  यांनी मनमानी करून भाववाढ केली.योग्य वजन आणि योग्य भावात वस्तू मिळेल याची खात्री देता येत नाही. Covid 19 मुळे उद्द्भवलेल्या या आपातकालीन परिस्थितीची झळ सर्वात जास्त सामान्य ग्राहकाला पोहचलेली आहे.मात्र या सामुहिक लूटीकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे.अधिकारी वर्गाचा वचकच राहिला नाही असे प्रतिपादन विकास महाजन यांनी बैठकीत केले.

बोगस बि बियाणे आणि खते यांची बेकायदेशीर  विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे तालुकाध्यक्षा आरती ठाकुर यांनी सुचित केले. बैठकीला डॉ.प्रशांत पाटील,पत्रकार कुंदनसिंह ठाकुर, डॉ.राखी काबरा,शोभा साळी,प्रणाली भोसले ,इंदिरा साळी या प्रमुख कार्यकर्त्यांसहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे उत्कृष्ठ नियोजन आणि सूत्र संचालन कुंदनसिंह ठाकुर यानी केले.आभार डॉ.प्रशांत पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.