बडोद्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात ; ११ जणांचा मृत्यू

0

गांधीनगर : गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर आज(बुधवार) पहाटे ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातातील जखमी सुरत इथून पावागडकडे जात होते. यावेळी ट्रक आणि कंटनेरमध्ये टक्कर झाल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींना तातडीने वडोदरा इथल्या एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अद्याप अपघाताचं मुख्य कारण कळू शकले नाही.

अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे . एका लग्नसमारंभातून ते परत येत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 11 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


दरम्यान, पोलीस सध्या घटनास्थळी अपघाती वाहन बाजूला करून प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांनी अपघाताची माहिती देण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत गुजरातमधील वडोदरा इथं झालेल्या दुसर्‍या रोड अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातही मृतांची संख्या जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.