बंद घर फोडून मुद्देमाल लंपास

0

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील निमखेडी शिवारात बंद घर फोडून घरातील सोन्याने दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ७२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी समोर आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक दिलीप कुमार गार्तीया (वय ३६, रा. टिळक नगर, निमखेडी शिवार जळगाव) हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ते घराला कुलूप लावून गावाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी जिन्याचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ७२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

रविवारी दुपारी १२ वाजता प्रतिक गार्तीय हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. प्रतिक गार्तीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.