पालकमंत्र्यांना भारिपच्या कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे

0


पूर्णवेळ पालकमंत्री देण्याची मागणी ; १० ते १२ आंदोलक ताब्यात
भुसावळ : जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने व चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशा घोषणा करून पालकमंत्री चंद्र्कांत पाटील यांना भारिपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला . यावेळी पोलिसांनी १० ते १२ आंदोलकांना ताब्यात घेतले. अटल कृषी योजना कार्यक्रमाला जाण्यासाठी भुसावळ येथून शासकीय विश्राम गृह इथे आले असता गांधी पुतळ्याजवळ भारिप बहुजन महासंघ जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाप्रमुख विजय उर्फ बाळा पवार यांच्या सह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवले.
फैजपूर येथे अटल कृषी महाशिबिरासाठी जाताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळला भारिप बहूजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. आज सकाळी अचानक घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांची शहरात चांगलीच तारांबळ उडाली.
राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावरअसून आज सकाळी फैजपूरला शासकिय कार्यक्रमासाठी भुसावळहून जात असताना भारीप बहुजन महासंघाच्यावतीने पालकमंत्र्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविले. या प्रकारानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले. तर शहर पोलिसांनी १० ते १२ आंदोलकांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.