फुले, आंबेडकर, शाहूंच्या नावाचा उल्लेख केल्याने भाजपाला इतका राग का? जयंत पाटील

0

मुंबई : महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीसांनी शिस्त पाळायला हवी होती, उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.