फवारणीच्या औषधाने विष बाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0

एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील जळू येथे कपाशीवर फवारणी करताना कपाशीच्या औषधाने विष बादा होऊन नामदेव किसन पाटील वय 45 वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी 12 ऑगस्ट  रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नामदेव किसन पाटील हे त्यांच्या शेतातील कपाशीवर फवारणी करताना फवारणीच्या औषधाने त्यांना विषबाधा झाली व ते बेशुद्ध पडले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी प्रथम उपचार होऊन त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शून्य क्रमांकाने नोंद होऊन कासोदा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला ईश्वर शांताराम पाटील यांनी खबर दिली आहे. त्यावरून अकस्मात मृत्यू शून्य क्रमांकाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.