नाचणखेड्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

0

पाचोरा :- तालुक्यातील नाचणखेडा येथील ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. सोनुसिंग रामसिंग पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सोनुसिंग पाटील यांची स्वत:ची शेती आहे; परंतु सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्ज झाले आहे. या कर्जाला कंटाळल्याने काही दिवसांपासून ते तणावात होते. दरम्यान, सोमवारी दुपारी १.३० वाजता त्यांच्या पत्नी, आई शेतात कामाला गेल्या होत्या. या वेळी घरात कोणी नसताना पाटील यांनी विषारी द्रव्य प्राषण केले. त्यांच्या लहान मुलाने ही घटना पाहिल्यानंतर बाहेर जाऊन लोकांना सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी पाटील यांच्या घरात धाव घेत त्यांना अत्यवस्थ अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालावली हाेती. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.