कुसुंब्यात माफीचा साक्षीदार झाल्याच्या कारणातून दंगल

0

जळगाव :- तालुक्यातील कुसंबा गावात ‘तु माफीचा साक्षीदार का होता?’ या कारणावरून दोन गटात वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात तलवार, कोयत्यासह लाठ्या-काठयांचा वापर करण्यात अाला असून चौघे जखमी झाले. पानटपरी व हॉटेलचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गावातील बसथांब्याजवळ घडली. एमआयडीसी पोलिसात जखमी दोघांच्या जबाबावरून परस्पराविरुध्द प्राणघातक हल्ल्यासह दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

‘तू माफीचा साक्षीदार का होता?’ या कारणावरून प्रविण शांताराम कोळी, रवींद्र शांताराम कोळी, विशाल शांताराम कोळी, विजू (पूर्ण नाव माहित नाही), शांताराम कोळी (पूर्ण नाव माहिती नाही रा. सर्व कुसुंबा) यांनी श्रावण शेनफडू कोळी यांच्याशी वाद घातला. या वादातून पाचही जणांनी श्रावण कोळी यांच्यावर हल्ला केला. त्यात प्रविण कोळी याने श्रावण कोळी यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले. तसेच शांताराम कोळी याने लोखंडी रॉडने तर इतरांनी लाठ्या-काठ्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याला जबर दुखापत झाली असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी श्रावण कोळी यांच्या जबाबावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात तुझ्या भावाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बसथांब्याजवळ हॉटेलचालक रवींद्र शांताराम बाविस्कर याला श्रावण शेनफडू कोळी, हिम्मत पाटील, पंडीत कोळी, योगेश कोळी, गोलू कोळी,गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजु कोळी रा. सर्व मराठी शाळेजवळ कुसुंबा यांनी लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्याच्या हॉटेलवर दगडफेक केली. यात हॉटेलचे नुकसान झाले असून त्याच्या दुकानाच्या गल्ल्यातील ७ हजार रुपये कोणीतरी जबरीने लुटून नेले. या मारहाणीत रविंद्र बाविस्कर यांच्यासह वडील व भाऊ प्रविण हे तिघे जखमी झाले आहे. जखमी रविंद्र याच्या जबाबावरून १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सिध्देश डापकर करीत आहे. घटनास्थळी डीवायएसपी डाॅ. नीलाभ राेहन यांनी भेट दिली.

कुसुंबा येथील हाणामारीत गंभीर जखमी झालेले नागरिक.

Leave A Reply

Your email address will not be published.