फडणवीसांनी करोना विषाणू गिळून ढेकर दिला असता का? शिवसेना

0

मुंबई: करोनासारख्या संकटाच्या काळात महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्याची गरज असल्याचं वक्तव्य भाजपचे निरंजन डावखरे यांनी केलं होतं. आता या वक्तव्याचा जोरदार समाचार शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून घेतला आहे. फडणवीस यांनी वेगळे काय केले असते? करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती की त्या विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून या व्हायरसची बोलती बंद केली असती? असा असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे.

संपूर्ण देश, आपला महाराष्ट्र करोना व्हायरसशी एक युद्ध म्हणून लढत आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या विषाणूशी इतका मोठा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ मोठी झुंज देत असताना भाजपातील काही उपर्‍या ‘अक्कलवंतां’नी टीकेची निरांजने ओवाळली आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव शून्य असल्याने आता महाराष्ट्राला म्हणे पुन्हा अनुभवसंपन्न देवेंद्र फडणवीसांची गरज आहे. उद्धव ठाकरे यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. भाजपातील उपर्‍यांना हा अधिकार कोणी दिला?,’ असा रोकडा सवाल शिवसेनेनं केलाय. ‘ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नसून एकमेकांना सहकार्य करून महाराष्ट्राला व देशाला वाचवण्याची आहे, असंही सुनावण्यात आलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.